मी सतरंज्या उचलण्यास तयार-उर्मिला मातोंडकर

शिवसैनिक हीच आता माझी ओळख

संग्रहित छायाचित्र

वेळ पडल्यास मी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे असं वक्तव्य आज उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे. मी शिवसेनेत लोकांची कामं करण्यासाठी आली आहेत. आज माझी ओळख शिवसैनिक अशीच आहे. शिवसेनेत आल्यानंतर मला शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आवडेल. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या अशी चर्चा कायम होत असते. त्याबाबत उर्मिला मातोंडकर यांना विचारलं असता मी प्रसंगी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच पुढे जायचं आहे. आज मी माझी ओळख ही शिवसैनिक अशी करुन देते आहे तशीच ती आहे. मी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच काम करणार आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आजच उर्मिला मातोंडकर यांनी शिवबंधन हातावर बांधत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आजपासून माझी ओळख ही शिवसैनिक आहे. मी शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

“मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे. शिवसैनिक म्हणूनच काम करेन. राज्यपालांकडे माझं नाव पाठवलं आहे. माझ्यावर पक्षप्रवेशाची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नव्हती, मुळात मला काम करण्याची इच्छा होती. त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ट्रोलर्स हीन पातळीवर जाऊन माझ्यावर वैयक्तिक टीका करतात, पण मी मराठी आहे आणि पुढेच पाऊल टाकणार, त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं करेन,” असं टोला मातोंडकर यांनी ट्रोलर्संना लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: I will work with shiv sena workers says urmila matondkar scj