मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून सातरस्ता येथील ४५ वर्षीय व्यक्तीकडून १५ लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. आरोपींनी तक्रारदाराच्या सोसायटीचे काम करण्याच्या नावाखाली ही रक्कम घेतली होती. याप्रकरणी तक्रारीनंतर तोतयागिरी व फसवणूक केल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला होता. सुहास महाडिक (५०) व किरण पाटील (५०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. महाडिक सातरस्ता परिसरातील रहिवासी आहे, तर पाटील हा टिटवाळा परिसरातील रहिवासी आहे. आरोपी सुहास महाडिक याच्याविरोधात यापूर्वी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात मारहाण व धमकावल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल होता.

हेही वाचा : इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून एकटीच आली; पण प्रियकराने मुंब्र्यात…

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 15 lakh fraud by pretending to be personal assistant of dcm devendra fadnavis mumbai print news css
First published on: 23-03-2024 at 22:02 IST