मुंबई : कॅम्लिन उद्योगसमूहाचे प्रमुख व हजारो कुटुंबाना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज (१५ जुलै) सकाळी सातच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.३० वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : म्हाडाच्या मुंबईतील पीएमएवायच्या घरांसाठी आता वार्षिक सहा लाखांची उत्त्पन्न मर्यादा, आगामी सोडतीत नवीन नियम लागू, इच्छुकांना दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुभाष दांडेकर हे चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीतील अग्रेसर अशा कॅम्लिन उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा व आधारस्तंभ होते. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या कंपनीची गेली अनेक वर्षे धुरा वाहताना दांडेकर यांनी उत्पादनांची गुणवत्ता व मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. काळानुसार बदलत गेलेल्या तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर करून सतत नवे प्रयोग करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या निधनानंतर एक उत्तम उद्योजक व रंगांचा जादूगार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.