बोलघेवडेपणामुळे स्वतःच्याच पायावर कुऱहाड मारून घेणारे खासदार गोपीनाथ मुंडे आणखी अडचणीत आले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याच्या वक्तव्याची प्राप्तिकर विभागानेही दखल घेतली. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने बुधवारी मुंडे यांना नोटीस बजावली.
निवडणुकीसाठी पूर्वी फार खर्च येत नसे. सुमारे २० वर्षांपूर्वी २९ हजार रुपये खर्च करून निवडून आलो, पण गेल्यावेळी आठ कोटी रुपये खर्च करावे लागले, असे वक्तव्य मुंडे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे प्रमुख समन्वयक विनय सहस्त्रबुध्दे यांच्या ‘बियॉंड ए बिलियन बॅलट्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. आता प्राप्तिकर विभागानेही नोटीस बजावल्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालीये.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2013 रोजी प्रकाशित
‘त्या’ वक्तव्यामुळे मुंडे यांना प्राप्तिकर विभागाचीही नोटीस
बोलघेवडेपणामुळे स्वतःच्याच पायावर कुऱहाड मारून घेणारे खासदार गोपीनाथ मुंडे आणखी अडचणीत आले आहेत.

First published on: 03-07-2013 at 02:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax department issues notice to gopinath munde