उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले अधिकारी अशी ओळख असलेले देवेन भारती यांच्यावर मुंबई विशेष पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती यांना बुधवारी मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं. मुंबई पोलीस दलात ही नवी पदनिर्मिती करण्यात आली असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. राज्याच्या गृह खात्याने देवेन भारती यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलं आहे. देवेन भारती यांची या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील अशी शक्यता आहे.

कोण आहेत देवेन भारती?
देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. देवेन भारती यांना डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखलं जातं. एप्रिल 2015 मध्ये मुंबईच्या सहपोलीस आयुक्त पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था ही जबाबदारी त्यांच्याकडे होती. या पदावर सर्वाधिक काळ सेवा बजावण्याची संधी देवेन भारती यांना मिळाली. या दरम्यान देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास केला. मुंबईतल्या हाय-प्रोफाईल प्रकरणांसह महत्त्वाच्या तपासांमध्ये देवेन भारती यांचा सहभाग होता. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा तपास, मिड डे या वृत्तपत्राचे पत्रकार जे.डे. यांच्या हत्येचा तपासही त्यांनी केला होता. राज्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यासाठी देवेन भारती ओळखले जातात. 26/11 प्रकरणातला दहशतवादी अजमल आमीर कसाब याला जेव्हा फाशी देण्यात आली त्याची जबाबदारी ज्या मोजक्या अधिकाऱ्यांवर सोपवली होती त्यापैकी एक देवेन भारती होते.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय
1994 चे बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. 2014 ते 2019 या कालावधीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्यांना दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं तेव्हा त्यांना साईड पोस्टिंग दिलं गेलं होतं. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकिय संचालक हे पद देवेन भारती यांना देण्यात आलं होतं.

देवेन भारती यांनी नुकतीच घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट
13 डिसेंबर 2022 ला देवेन भारती यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्त या पदावर देवेन भारती यांची नेमणूक करण्यात आली आहे.