ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहायक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडली. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आज कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना, त्यांच्यावर एका फेरीवाल्याने धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला आणि यामध्ये त्यांची तीन बोटं तुटली असून डोक्याला देखील गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या खळबळजनक व संतापजनक घटनेवरून भाजपान नेते आशिष शेलार यांनी आता राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करुन एका फेरिवाल्याने तीन बोटे तोडल्याची अत्यंत चिड आणणारी घटना आज ठाण्यात घडली. राज्यात कायद्याचे राज्य आहे का? सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते!” असा संतप्त सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे केला आहे.
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करुन एका फेरिवाल्याने तीन बोटे तोडल्याची अत्यंत चिड आणणारी घटना आज ठाण्यात घडली.
राज्यात कायद्याचे राज्य आहे का? सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का?
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 30, 2021
धक्कादायक : ठाणे मनपा अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा प्राणघातक हल्ला; तीन बोटं तुटली!
सध्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सुरूवातीला ठाण्यामधील वेदांता रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना पुढील उपचारांसाठी ज्युपिटर रूग्णालयात हलवण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे भर दिवसा एखाद्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला होत असल्याने, या घटनेमुळे एकच खबळबळउडाली आहे. तर, घटना घडली त्यावेळी कल्पिता पिंपळे यांच्यासोबत असलेला अंगरक्षक देखील त्यांच्या मदतीला धावून आला होता, त्यामळे या हल्ल्या तो देखील जखमी झाला असून त्याच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.