दोन अज्ञात इसमांनी शनिवारी भर दिवसा मालाडमधील जवाहिराच्या दुकानात दरोडा टाकून १.३१ कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला.
मालाडमधील ‘राज राजेश्वरी’ या जवाहिराच्या दुकानामध्ये सकाळी सव्वानऊच्या सुमारास दोन अज्ञात इसम चेहऱ्यावर रुमाल गुंडाळून आले. दुकानमालक राठोड त्यावेळी दुकानात होते. त्यांनी या दोघांना विरोध केला. त्यांच्यात झालेल्या झटापटीत राठोड यांच्या हाताला जखम झाली. लुटारुंनी राठोड यांना बांधून ठेवले आणि सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १.३१ कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला. कर्मचारी दुकानात येताच राठोड यांना बांधून ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांची सुटका करुन त्यांना सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आले.