Kabutarkhana : कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची धरपकड सुरु झाली आहे. त्यानंतर किती जैन आंदोलकांवर कारवाई केली ते सांगा असा सवाल आंदोलकांनी केला आहे. दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे. तसेच कायदा न मानणारे पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दादर कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन पुकारण्यात आलं. मात्र या आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. सकाळी ११ नंतर आंदोलक जमू लागले, यानंतर तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

कबुतरखाना बंदीचा विषय हा धार्मिक नाही-मराठी एकीकरण समिती

कबुतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही. कबुतरखाना बंदीचा हा विषय सामाजिक आहे. त्यामुळे कबुतरखआना बंदीला जातीयवादाचा रंग देऊ नका. त्या दिवशी जैन समाजाने जे आंदोलन केले, त्यावेळी तुम्ही जैन समाजाच्या आंदोलकांवर काही कारवाई केली का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. तसेच मराठी एकीकरण समितीने कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा, असे आवाहनही यावेळी केलं.

दादरच्या कबुतरखाना परिसराता छावणीचं स्वरुप

दादरच्या कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचे अनेक आंदोलक जमले आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच नोटीस बजावली होती. यावेळी अनेक आंदोलक हे डोक्यावर टोपी घालून जोरदार घोषणाबाजी करताना दिसले. तसेच काही जणांना ताब्यातही घेतले जात आहे. सध्या कबुतरखान्याला छावणीचे स्वरुप आले आहे. या परिसरातील आजूबाजूच्या सोसायटीमधील लोकही या आंदोलना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे. सध्या या परिसरातील लोकही या आंदोलनात उतरताना दिसत आहेत. त्यामुळे दादरच्या कबुतरखाना परिसरात मोठं आंदोलन सुरु असून सध्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. जैन समाजाच्या आंदोलकांवर कारवाई का नाही? किती जैन आंदोलकांवर कारवाई केली ते सांगा? असा प्रश्न मराठी एकीकरण समितीचे आंदोलक विचारत आहेत.

गोवर्धन देशमुख यांची प्रतिक्रिया काय?

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोवर्धन देशमुख हे इथे पोहोचल्यानंतर लगेचच त्यांना पोलिसांनी घेराव घातला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी गोवर्धन देशमुख यांनी “पोलिसांनी आम्हाला आमची भूमिका मांडू द्यावी, आम्ही फक्त आमचे म्हणणं मांडायला आलो आहोत. आम्ही फक्त पोलिसांना निवदेन देण्यासाठी आलो आहोत, पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. त्यांनी ही दडपशाही थांबवावी, तसेच आणीबाणीचा काळ आणू नये”, असेही गोवर्धन देशमुख यांनी म्हटलं आहे.