कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपाने मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयाबाहेर जोरदार तयारी केली आहे. भाजपाने एलआयसी इमारतीपासून स्वत:च्या कार्यालयापर्यंत पक्षाचा झेंडा फिरवला असून बाहेर निकाल पाहण्यासाठी स्क्रिन लावली आहे. भाजपा कार्यालयाबाहेर भगव्या रंगाचा स्टेज उभारण्यात आला असून बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपाने विजयाचे जंगी सेलिब्रेशन करण्याची पूर्ण तयारी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून सध्या जे कल हाती आले आहेत त्यानुसार त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. भाजपाचे उमेदवार शंभरपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असून देवेगौडा यांना जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरेल असे चित्र आहे.

सिद्धरामय्या चामुंडेश्वरीत पिछाडीवर
कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांना हादरा बसला आहे. निवडणुकीच्या पहिल्या तासाभरातील कलानुसार सिद्धरामय्या चामुंडेश्वरीत पिछाडीवर असून बदामी या मतदारसंघातून ते आघाडीवर आहेत.

शिकारीपूरामधून भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा आघाडीवर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस. येडियुरप्पा शिकारीपूरा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. शिकारीपूरा विधानसभा मतदारसंघ येडियुरप्पांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. फक्त १९९९ साली शिकारीपूरा मतदारसंघातून महालिंगाप्पा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर येडियुरप्पांचा पराभव केला होता.

कर्नाटकात बाजी मारणारेच २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकतील
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता येत्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना योगगुरु रामदेव बाबा यांनी मोठे भाकित वर्तवले आहे. कर्नाटक निवडणुकीचा निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल. कारण, जो पक्ष ही निवडणूक जिंकेल त्यांच्यात २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असेल असे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karanataka assembly election bjp mumbai
First published on: 15-05-2018 at 09:53 IST