scorecardresearch

मुंबई :शरद पवार यांनाही प्रतिवादी करा ; मागणीसाठी केतकी चितळे उच्च न्यायालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री केतकी चितळे हिने उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

मुंबई :शरद पवार यांनाही प्रतिवादी करा ; मागणीसाठी केतकी चितळे उच्च न्यायालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री केतकी चितळे हिने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत पवार यांनाही प्रतिवादी करण्यात यावे या मागणीसाठी केतकीने शुक्रवारी उच्च न्यायालयात याचिका केली.

केतकीविरोधात कळवा पोलिसांत पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यात तिला अटकही करण्यात आली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आले. त्यानंतर केतकीने अटकेला आव्हान देताना तिच्याविरोधात नोंदवलेले सगळे गुन्हे एकत्रित करण्याची, ते रद्द करण्याची मागणी केली होती. केतकीने नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे. केतकीविरोधात २२ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

केतकीने शुक्रवारी केलेल्या याचिकेनुसार, तिने समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या मजकूरात पवार शब्दाचा उल्लेख होता. तो उल्लेख शरद पवार यांच्याबाबतच होता. तसेच तिच्याविरोधात विविध गुन्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले आहेत. मात्र पवार यांनी आपल्याविरोधात तक्रार केलेली नाही. पवार सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असून ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. त्यामुळे पवार यांनी कोणतीही तक्रार केलेली नसतानाही आपल्याविरोधात गुन्हे दाखल केले गेले. ते करणे योग्य आहे का, असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. तसेच या प्रश्नाची पडताळणी करण्यासाठी पवार यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना प्रतिवादी करण्याची मागणी केतकी हिने केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 22:30 IST

संबंधित बातम्या