scorecardresearch

भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेचा खडसेंकडून इन्कार; अमित शहा-खडसे यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दूरध्वनी करून चर्चा केली.

भाजपमध्ये परतण्याच्या चर्चेचा खडसेंकडून इन्कार; अमित शहा-खडसे यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण
अमित शहा-एकनाथ खडसे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दूरध्वनी करून चर्चा केली. त्यामुळे खडसे भाजपमध्ये परतण्याची चर्चा सुरू असली तरी खडसे यांनी त्याचा ठामपणे इन्कार केला आहे. खडसे यांनी नवी दिल्लीला जाऊन सून खासदार रक्षा खडसे यांच्याबरोबर शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट न झाल्याने त्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यावरून खडसे भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या तोंडावर लोढांकडे मुंबई उपनगरची धुरा; विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद फडणवीस यांच्याकडे

हेही वाचा >>> ठाण्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाईंकडे; फडणवीस यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी

पण शहा हे केंद्रीय गृहमंत्री असून मी वैयक्तिक कारणांसाठी त्यांना दूरध्वनी केला. त्यांच्याशी माझे पूर्वीपासून संबंध असून त्यात काहीच गैर नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ते माहीत आहे, मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या