मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली. मात्र संबंधित न्यायालयाचे न्यायाधीश शुक्रवारी उपलब्ध न झाल्याने नील यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर

पंजाब आणि महाराष्ट्र (पीएमसी) बँक घोटाळय़ातील आरोपी राजेश वाधवान याचे नील सोमय्या यांच्याशी संबंध असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. पीएमसी बँक घोटळय़ाचे पैसे निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीत गुंतवल्याचा आरोप करताना या प्रकरणी सोमय्या बाप-बेटे तुरुंगात जातील, असे विधानही राऊतांनी केले होते. निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सोमय्या यांच्या मालकीची कंपनी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसला तरी नील यांना अटकेची भीती आहे.