किरीट सोमय्यांना दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने नोटीस पाठवली होती. या प्रकरणावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंत्रालयाला दिले आहेत. पण मुख्यमंत्रीसाहेब मी वाट पाहतोय तुम्ही गुन्हा कधी दाखल करताय ते. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंना आव्हान आहे की तुमच्यात हिम्मत असेल तर एफआयआर दाखल करा,” असं किरीट सोमय्या म्हणाले.

“फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत आहेत. दोष काय तर मी खुर्चीवर बसलोय. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहे. उद्धव ठाकरे जे खोटं बोलले ती चोरी मी पकडली, त्याचा राग त्या कर्मचाऱ्यांवर ते काढत आहेत. एका गरीब टायपिस्ट लिपीकाला तुम्ही नोटीस देताय. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बघा. राजकीय भ्रष्टाचार तुम्ही करताय, लढाई करायची आहे तर माझ्याशी करा, माझ्यावर कारवाई करा, त्या गरीब लिपीकाला नोटीस पाठवताना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला. मुख्यमंत्र्यांना त्या लिपीकाच्या कुटुंबाची माफी मागावी लागणार,” असं ते म्हणाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

“मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी….”; किरीट सोमय्यांचा घणाघात

“उद्धव ठाकरेंना तो फोटो कोणी काढला आहे, ते माहीत आहे. त्या टायपिस्टसोबत बदला घेण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलंय. हा फोटो कोणी काढलाय ते तपासून पाहा. तुमच्याकडे मंत्रालय सुरक्षा विभाग आहे,” असं सोमय्या म्हणाले. “तसेच मला कोणत्या कायद्याच्या आधारे नोटीस पाठवली आहे. कायद्याचं सेक्शन दाखवा. की हा उद्धव ठाकरेंचा कायदा आहे, त्यांची ठोकशाही, माफिया सेनेची दादागिरी आणि गुंडागिरी आहे,” असा सवाल त्यांनी केला.फोटो काढणारा माणूस नक्की कोण होता. तो आदित्य ठाकरेंचा चमचा होता का, असंही सोमय्या म्हणाले.

“मी १७ जानेवारीला माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता. प्रश्न काय तर खुर्चीवर का बसवलं.  मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मी कागदपत्रांची पडताळणी करून आलोय. ग्रामविकास मंत्रालय आणि इतर ठिकाणी त्यांनी केलेली कागदपत्रांची पडताळणी करून आलो, या सर्व ठिकाणी मला खुर्ची देण्यात आली होती, त्या सर्वांना तुम्ही नोटीस पाठवणार का,” असा सवाल यावेळी सोमय्यांनी केला.

नेमकं प्रकरण काय?

राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनाधिकृत बांधकामास पालिकेने लावलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत सोमय्या यांनी माहिती अधिकारात नगरविकास विभागाकडे या निर्णयासंदर्भातील माहिती मागविली होती. त्यानुसार  नगरविकास विभागाने सोमय्या यांना सोमवारी १.२० वाजता फाइल अवलोकनासाठी बोलाविले होते. सोमय्या यांनी नगर विकास विभागातील कक्ष क्रमांक ११६ मध्ये जाऊन काही फाइल्स तपासल्या. त्या वेळी ते शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून या फाइल्स बघत होते. त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरल्यावर वादाला तोंड फुटले आहे. सोमय्या यांनी कोणत्या फाइल्स कोणत्या अधिकारात तपासल्या, माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता का, शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत ते का बसले होते, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेत नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

सोमय्या यांनी अधिकऱ्यांच्या खूर्चीत बसून फाइल चाळणे आणि त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्याप्रकरणी  एक कक्ष अधिकारी आणि दोन नगरनियोजन अधिकारी अशा तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  त्याचप्रमाणे  सरकारने सोमय्या यांनाही नोटीस बजावली असून कार्यालयात फाइलीचे अवलोकन करीत असताना अधिकाऱ्यांची छायाचित्रे विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होणे ही कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून अनुचित असल्याने, सदर कृतीबद्दल दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश सोमय्या यांना देण्यात आले असून तसे पत्रही पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Story img Loader