दिवाळीनिमित्त कोकण व गोवा येथे जाणाऱ्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी या दरम्यान १६ विशेष फेऱ्या चालवणार आहे. १० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या फेऱ्या दर आठवडय़ाला असतील. या फेऱ्यांचे आरक्षण सुरू झाले आहे.
अप मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी १०, १७, २४, ३१ ऑक्टोबर आणि ०७, १४, २१, २८ नोव्हेंबर या दिवशी मडगावहून दुपारी १२.३० वाजता रवाना होईल, तर डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव ही गाडी ११, १८, २५ ऑक्टोबर रोजी रात्री १.१० वाजता निघून मडगावला दुपारी २.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला १३ डबे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2014 रोजी प्रकाशित
कोकण रेल्वेमार्गावर दिवाळीनिमित्त विशेष गाडी
दिवाळीनिमित्त कोकण व गोवा येथे जाणाऱ्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी या दरम्यान १६ विशेष फेऱ्या चालवणार आहे.
First published on: 10-10-2014 at 05:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway special train for diwali