Lalbaugcha Raja 2025 First Look : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २७ ऑगस्टपासून देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अनेकजण उत्सुक असून आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, आज (२४ ऑगस्ट) मुंबईतील लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन सोहळा पार पडला आहे.

मुंबईतील लालबागच्या राजाचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. खरं तर मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख नवसाला पावणारा बाप्पा अशी आहे. त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यभरातून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दर वर्षी भाविक येत असतात.

दरम्यान, या वर्षाच्या लालबागचा राजा’ची पहिली झलक आज भक्तांना पाहायला मिळाली आहे. तसेच मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा आता भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे. आज प्रथम दर्शनाच्या सोहळ्यासाठी देखील लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भक्तांच्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक वर्षभरापासून आतुर असतात.

बातमी अपडेट होत आहे.