मुंबई : ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जे. जे. समूह रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुरुवारी  महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांतील सर्वात मोठय़ा शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागाचे आणि नुतनीकरण केलेल्या मॉडय़ुलर शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन करण्यात आले. मॉडय़ुलर शस्त्रक्रियागृहामुळे वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसून शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

जे. जे. रुग्णालयात सुरू करण्यात आलेले शस्त्रक्रिया अतिदक्षता विभाग आणि मॉडयुलर शस्त्रक्रियागृह हे रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असून त्याचा लाभ हा गरजू रुग्णांना नक्कीच होईल, असे प्रतिपादन मुश्रीफ यांनी केले. या शस्त्रक्रियागृहामधून वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसल्या जागी शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण बघता येणार असल्याचे नमूद करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालय प्रशासनाचे अभिनंदन केले.

loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट

हेही वाचा >>> ३८८ स्थगित प्रकल्पांतील बँक खाती गोठवण्याचेही महारेराकडून आदेश! सदनिकांच्या विक्रीवर बंदी

जे. जे. हॉस्पिटलमध्ये येत्या काळात विविध उपकरणांनी सुसज्ज अशा अद्ययावत सोयीसुविधा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी स्थानिक आमदार यामिनी यशवंत जाधव उपस्थित होत्या. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे व इतर मान्यवर उपस्थित होते.

लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग..

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेले मुंबईतील जे. जे. रुग्णालय, पुण्यातील ससून रुग्णालय, छत्रपती संभाजी नगरमधील शासकीय रुग्णालय आणि नागपूरमधील शासकीय रुग्णालय येथे लवकरच मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण विभागाची सुरुवात करण्यात येईल अशीही घोषणा करण्यात आली.