‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२१’चा सन्मान सोहळा

मुंबई : करोनाकाळाचे भान ठेवत, सरकारी नियमांचे काटेकोर पालन करीत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने साजरा केला. या उत्सवात मंडळांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२१’ने केले. या स्पर्धेअंतर्गत मुंबईतील ‘संर्वांगसुंदर गणेश’ निवडण्यात आले. हा गौरव सोहळा मंगळवारी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात शासन नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने पार पडला.

करोनामुळे गेली दोन वर्षे उत्सवाचे स्वरूप पूर्णत: बदलले आहे. उंचीची भव्यता, मंडपांचा दिमाख, ढोलताशांचा कडकडाट, सजावट, रोषणाई, भाविकांची गर्दी यांवर मर्यादा आल्याने यंदाचा गणेशोत्सवही सरकारी नियमावलीनुसार साजरा करण्यात आला. अशा वेळी परंपरेसोबत सामाजिक भान जपण्याचे काम मंडळांनी केले. दरवर्षीसारखा उत्साह यंदा गणेशोत्सवात नव्हता, परंतु लोकहिताची कामे करण्यास मंडळांनी प्राधान्य दिले. त्यामुळे अशा मंडळांना सन्मानित करण्यासाठी ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते.

‘सर्वांग सुंदर गणेशमूर्ती’ या शीर्षकाअंतर्गत सहा विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कुलाबा ते अंधेरी, सीएसएमटी ते मुलुंड, जोगेश्वरी ते दहिसर, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली-कल्याण अशी वर्गवारी करण्यात आली होती. या सहा विभागांमधून अनेक मंडळे स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यापैकी प्रत्येक विभागातून तीन ‘सर्वांगसुंदर गणेशमूर्ती’ निवडण्यात आल्या, तर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्वोत्कृष्ट पर्यावरणस्नेही मूर्ती’चा मान अंधेरी येथील ‘स्वप्नाक्षय मित्र मंडळा’ने पटकावला.

हा सोहळा सर्व शासन नियमांचे पालन करून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रत्येक मंडळातून केवळ दोन ते तीन कार्यकर्तेच उपस्थित होते. पुरस्काराबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. विजेत्यांना मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ‘गेली दोन वर्षे उत्सवावर करोनाचे सावट असल्याने निराशेचे वातावरण आहे. अशा काळात उत्सव करताना ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या स्पर्धांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते, असा अभिप्राय उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदवला. तसेच येत्या गणेशोत्सवापर्यंत करोनाच्या संकटातून देश मुक्त करण्याचे गाºहाणे यावेळी गणरायाचरणी घातले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जºहाड, जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे, फाइव्हब्रिक रिअल्टी प्रा. लि.चे दीपक मोरे, ‘लोकसत्ता’चे तरुणकुमार तिवाडी, केवीन सँटोस, संजय तेलंगे, संतोष प्रधान यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिलीप वैती आणि प्रसाद तारकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा- २०२१ चे विजेते

‘सर्वांगसुंदर गणेश मूर्ती’

’ कुलाबा ते

अंधेरी विभाग:

आंध्र जन संघ गणेशोत्सव मंडळ, सांताक्रूझ

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आंबडेकरनगर, वरळी

खारवा गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ, खेतवाडी

’ सीएसएमटी ते मुलुंड विभाग :

जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळाचौकी

बाळ मित्र क्रीडा मंडळ, भांडुप

शिवशक्ती सेवा मंडळ, धारावी

जोगेश्वरी ते दहिसर विभाग :

श्री श्रद्धा मित्र मंडळ, दहिसर

श्री सिद्धिविनायक बाळ मित्र मंडळ, कांदिवली

साहसी क्रीडा मंडळ, बोरिवली

’ ठाणे विभाग :

गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे

शिव सम्राट मित्र मंडळ, कोपरी ठाणे

श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे

’ नवी मुंबई विभाग :

अर्जुन सोसायटी गणेशोत्सव मंडळ, घणसोली

लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती, नेरुळ

सानपाड्याचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर १०

’ डोंबिवली-कल्याण विभाग :

शिवनेरी मित्र मंडळ, डोंबिवली

श्री सिद्धिविनायक  मित्र मंडळ,  डोंबिवली

स्नेहांकित मित्र मंडळ, डोंबिवली

विशेष पारितोषिक

’ ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरणस्नेही मूर्ती’: स्वप्नाक्षय

मित्र मंडळ,  अंधेरी

प्रायोजक

’ मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

’ इकोफ्रेंडली पार्टनर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’ पॉवर्ड बाय : फाइव्हब्रिक रिअल्टी प्रा. लि.