कल्याणमध्ये ‘लोकसत्ता ९९९’ उत्साहात

विविधखेळांबरोबरच चकली-चिवडा-फराळ स्पर्धा, प्रश्नमंजूषा यांसारख्या विविध स्पर्धानी या कार्यक्रमात रंगत आणली

‘लोकसत्ता ९९९’ उपक्रमात कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरात असलेल्या अन्नपूर्णानगर मित्र मंडळाला ‘लोकसत्ता’तर्फे ९ हजार ९९९ रुपयांचा धनादेश देण्यात आला. या वेळी राम बंधू चिवडा मसाल्याचे विपणन व्यवस्थापक भानुदास गुंडकर, ‘लोकसत्ता’चे धर्मेश म्हसकर आणि मंडळाचे कार्यकर्ते.

विविध स्पर्धामुळे कार्यक्रमात रंगत; अभिनेत्री हेमांगी कवी यांची उपस्थिती

नवभक्ती, नवशक्ती आणि नवरंग असा तिहेरी संगम असलेला ‘लोकसत्ता ९९९’ उपक्रम शनिवारी कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरातील अन्नपूर्णानगर मित्र मंडळात उत्साहात साजरा झाला.

विविधखेळांबरोबरच चकली-चिवडा-फराळ स्पर्धा, प्रश्नमंजूषा यांसारख्या विविध स्पर्धानी या कार्यक्रमात रंगत आणली. तरुणांनी सादर केलेल्या नृत्यात उपस्थितांनीही ठेका धरला. या वेळी अभिनेत्री हेमांगी कवी उपस्थित होत्या.

नवरात्रोत्सव फक्त गरबा आणि रास दांडियापुरता मर्यादित न ठेवता त्याची मराठमोळ्या संस्कृतीशी सांगड घालण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘नवभक्ती, नवशक्ती आणि नवरंग ९९९’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. राम बंधू चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’अंतर्गत या उपक्रमाला ठाण्यापासून सुरुवात झाली असून नऊ दिवस मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि वसई-विरार या शहरांमधील निवडक मंडळांमध्ये हा उपक्रम मोठय़ा उत्साहात सुरू आहे.

या उपक्रमाचा सातवा सोहळा कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरात असलेल्या अन्नपूर्णानगर मित्र मंडळात झाला. सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या प्रमुख उपस्थितीसह ‘ही तुझी माझी यारी’ या आगामी चित्रपटातील अभिनेत्री दिव्या पुगावकर, अभिनेता सनीभूषण प्रमोद मुणगेकर, रोहन कदम, दिग्दर्शक निखिल कटारे आणि संगीतकार नितीन मोरजकर हेही आवर्जून उपस्थित होते. या स्पर्धेत कुणाल रेगे आणि प्रिया साटेलकर यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने रंगत आणली. या वेळी तरुणांनी ‘गं आई तुझं देऊल’, ‘चला जेजुरीला जाऊ’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. उपस्थितांनीही या गाण्यांवर ठेका धरला.

विविध मसाले वापरून बनविलेल्या पदार्थाची पाच नावे सांगणे, टोपलीमध्ये वस्तू आणून देणे, स्ट्रॉ जोडणे आणि पाककला अशा विविध स्पर्धा या वेळी घेण्यात आल्या. अशा मनोरंजक स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना व्यक्त होण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिले आहे, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या. या खेळांमध्ये सहभागी झालेल्या आणि विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.

मंडळाच्या स्थानिक जोडप्यांसाठी हार, अंगठी आणि पैंजण असा गमतीशीर खेळ घेण्यात आला. यामध्ये जोडप्यांनी उखाणे घेतले. हार, अंगठी आणि पैंजण या खेळात विजेत्या ठरलेल्या मोनाली चौधरी यांना ‘एम. के. घारे ज्वेलर्स’चा एक लखलखता हार अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या हस्ते देण्यात आला. चकली-चिवडा-फराळ स्पर्धेत महिला मोठय़ा उत्साहात सहभागी झाल्या. यात महाविद्यालयीन तरुणींपासून वृद्धांपर्यंत सर्वानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक हिमा जाधव आणि शीतल बोरस यांना देण्यात आले. तर चौथे पारितोषिक अलका सराफ, तृतीय पारितोषिक भारती मुकनाक, द्वितीय पारितोषिक कामिनी उनावणे आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विद्या कुळकर्णी यांना देऊन गौरवण्यात आले.

या पाककला स्पर्धेत दगडी पोहे चिवडा, भाजणीची चकली, उपवासाचा चिवडा, हिरवी मिर्ची चिवडा, फारसी पुरी, कोथिंबीर चिवडा, लसूण चिवडा आणि गव्हाच्या पिठाची चकली असे विविध पदार्थ स्पर्धेसाठी महिलांनी तयार करून आणले होते. या स्पर्धेचे परीक्षण अभिनेत्री हेमांगी कवी आणि सूत्रसंचालक प्रिया साटेलकर यांनी केले.  ‘लोकसत्ता ९९९’ कार्यक्रमात ‘राम बंधू मसाला’चे अरुण राणे, जगदीश गुप्ता, श्रीकांत तिवारी, शीला तिवारी, नवनाथ जाधव, गणेश वेखंडे, राजू विचारे आणि विभूतीनाथ झा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अन्नपूर्णानगर मित्र मंडळाला ‘लोकसत्ता’तर्फे ९ हजार ९९९ रुपयांचा धनादेश राम बंधू चिवडा मसाल्याचे विपणन व्यवस्थापक भानुदास गुंडकर आणि ‘लोकसत्ता’चे धर्मेश म्हसकर यांच्या हस्ते देण्यात आला.

प्रायोजक

राम बंधू चिवडा मसाला प्रस्तुत लोकसत्ता ९९९ चे सहप्रायोजक इन्फ्राटेक आहेत. तर कार्यक्रम एम. के. घारे ज्वेलर्सने पॉवर्ड बाय केला असून बँकिंग पार्टनर अपना सहकारी बँक लिमिटेड आहे.

आज दादरमध्ये

‘लोकसत्ता ९९९’ हा उपक्रम सोमवारी (७ ऑक्टोबर) दादर पश्चिम येथील गोखले रोड परिसरात असणाऱ्या ‘सवरेदय नवरात्रोत्सव मंडळ’ पोर्तुगीज चर्चजवळ होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lokasatta 999 cheers in kalyan abn

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या