शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत सद्यस्थितीत काय करावे, नव्या टप्प्याची वाट पाहावी, की लगेच गुंतवणूक करावी, अशा विविध प्रश्नांची उत्तरे आज (गुरुवार) मिळणार आहेत. निमित्त आहे ‘लोकसत्ता’च्या ‘अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन आणि ‘आर्थिक गुंतवणुकीच्या सल्ल्या’चे!
‘आर्थिक आरोग्याची गुरुकिल्ली’ समजला जाणारा ‘लोकसत्ता’चा २०१६-१७ साठीचा ‘अर्थब्रह्म’ हा विशेषांक आज प्रकाशित होत आहे.
रिजेन्सी ग्रुप प्रस्तुत आणि बीएनपी पारिबास म्युच्युअल फंड यांचे सहप्रायोजकत्व लाभलेल्या या उपक्रमासाठी (पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, केसरी आणि नातू परांजपे) प्रवेश विनामूल्य आहे.
अलीकडे अल्पबचत योजनांच्या तसेच बँकांच्या मुदत ठेवींच्या व्याज दरात कपात झाली आहे, दर तिमाहीला होणारे व्याज दरातील फेरबदल पाहता, गुंतवणुकीसाठी सद्य:स्थितीत शेअर बाजार सर्वोत्तम पर्याय म्हणायचा काय? ही गुंतवणूक थेट शेअर्समध्ये करावी की म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून? कुटुंबासाठी ठरविलेली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचे टप्पे व मार्ग कोणते? यावर गुंतवणूक विश्लेषक आणि नियोजनकार अजय वाळिंबे आणि भक्ती रसाळ मार्गदर्शन करणार आहेत. तर सनदी लेखाकार असलेले चंद्रशेखर वझे हे करविषयक नियोजन करून संपत्ती निर्माण साधता येते आणि सर्वसामान्य पगारदारांनाही ते कसे शक्य आहे, हे सोप्या भाषेत सांगतील.
श्रोत्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद व शंका निरसन करून घेण्याची संधी या निमित्ताने मिळेल. तर मग तुमचे प्रश्न घेऊन आवर्जून उपस्थित
राहा..!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केव्हा, कुठे?
आज
वेळ : सायं. ६ वाजता
स्थळ : यशवंत नाटय़ मंदिर, जे. के. सावंत मार्ग, माटुंगा (प.)
सहभाग: अजय वाळिंबे, भक्ती रसाळ आणि चंद्रशेखर वझे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arth brahma book release today
First published on: 28-04-2016 at 05:31 IST