या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनी बाळगलेले स्वप्न पूर्ण करणारे, सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग दाखविणारे आणि वर्षांगणिक आकर्षक परतावा देणारे ‘लोकसत्ता – अर्थसल्ला’ गुंतवणूक मार्गदर्शन येत्या शनिवारी, ३० जुलै रोजी वाशीमध्ये होणार आहे.

मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर -६, वाशी येथे सायंकाळी ६.०० वाजता होणारा कार्यक्रम ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’  प्रस्तुत करत आहे. यावेळी आर्थिक नियोजनकार मिलिंद अंध्रुटकर हे ‘अर्थ नियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयावर सविस्तर भाष्य करतील. तर  ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभ लेखक वसंत

कुलकर्णी यांचे ‘म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर मार्गदर्शन होईल.

गुंतवणूक व बचत यातील फरक, त्यांचे माध्यम तसेच त्यामार्फत मिळणारा परतावा याबाबत अंध्रुटकर उपस्थित मार्गदर्शन करतील. पारंपरिक बचत योजना, भविष्य निर्वाह निधी तसेच नवीन निवृत्ती योजना यांची माहितीही यावेळी दिली जाईल. तर भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंड यांचा संबंध, दोघांची परतावा तुलना, फंड निवडीतील तारतम्य हे कुलकर्णी विशद करतील.

वक्ते यावेळी सुलभता व सोदाहरणासह गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करतील. उपस्थित श्रोत्यांना यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांना गुंतवणूकविषयक प्रश्न विचारण्याची संधीदेखील उपलब्ध आहे. कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य आहे.

केव्हा, कुठे?

शनिवार, ३० जुलै २०१६  सायंकाळी ६.०० वा.

स्थळ : मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर-६, वाशी, नवी मुंबई</p>

तज्ज्ञ मार्गदर्शक : मिलिंद अंध्रुटकर आणि वसंत कुलकर्णी

Mutual fund investments are subject to market risk. Please read the offer documents carefully before investing.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arth salla program in vashi
First published on: 28-07-2016 at 03:59 IST