मुंबई : ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५’साठी शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, कला, क्रीडा, तंत्रज्ञान, औद्याोगिक, संशोधन, संरक्षण आदी विविध क्षेत्रांत आपल्यातील गुणवत्तेच्या बळावर समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांचा शोध सुरू झाला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अनेक अडथळ्यांवर मात करून अनोख्या वाटेवरून यशस्वी वाटचाल करत आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे अशा स्त्रियांचा दरवर्षी ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’ने सन्मान केला जातो. यंदा या पुरस्काराचे १२वे वर्ष असून या पुरस्कारांसाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
समाजाला नवी दिशा, प्रेरणा देणाऱ्या आणि स्वत:ला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांची राज्यभरातून नामांकने मागवली जातात. त्यानंतर तज्ज्ञ परीक्षकांची समिती दरवर्षी या नामांकनांतून दुर्गांची निवड करते. स्त्रीशक्तीला नवी दिशा देणाऱ्या, हुशारी आणि चिकाटीने समाजासाठी अविरत कार्य करणाऱ्या ‘दुर्गां’च्या निवडीनंतर दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत दररोज एका दुर्गेची ‘लोकसत्ता’मधून ओळख करून दिली जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या शानदार संगीतमय सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते दुर्गांचा सन्मान केला जाणार आहे.
माहिती कुठे पाठवाल?
नामांकने फक्त
loksattanavdurga @gmail. com या ई-मेल आयडीवर पाठवावीत. त्याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
टपालाने पाठवायची असल्यास पत्ता पुढीलप्रमाणे –
‘लोकसत्ता’ – महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०.
प्रायोजक
● सहप्रायोजक : टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड
वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स
चितळे डेअरी
ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड
‘दुर्गां’च्या निवडीनंतर दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत दररोज एका दुर्गेची ‘लोकसत्ता’मधून ओळख करून दिली जाईल.