रोजच्या घटनांतून चाकोरीबाह्य़ वृत्त आणि वृत्तलेखांच्या वाचनाची शंभर नंबरी हमी देणाऱ्या लोकलाडक्या ‘लोकसत्ता’ने यंदाही वाचकांना विचार श्रीमंतीचे वाचनमौजी वर्ष देण्याचे धनुष्य पेलले आहे. आजपासून नव्या रुपडय़ासह दाखल होणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या पानापानांत माहिती, ज्ञान आणि रंजनाच्या सर्वोत्तम मजकुराचा अंतर्भाव असणार आहे. राजकारण, समाजदर्शन, आर्थिक, सांस्कृतिक, चित्रपट क्षेत्रांतील दिग्गज ‘दादा’ लेखणीचा आविष्कार अंकाच्या पुरवण्या आणि संपादकीय पानांमधून वर्षभर वाचन असोशी वाढविण्यासाठी उपस्थित राहणार आहे.
शेषराव मोरे यांच्या ‘संस्कृती खुणां’पासून ते रुबिना पटेल यांच्या ‘संघर्षसंवादा’पर्यंत वाचकांच्या रुढ विचारसरणीला हलवून सोडणारी सदरे संपादकीय पानांमध्ये अनुभवायला मिळणार आहेत.
वाचकांशी बहुपेढी संवाद साधणाऱ्या ‘चतुरंग’मध्ये अंजली श्रोत्रीय यांचे ‘जगू आनंदे’, समाजभान देणाऱ्या मुलांची जीवनगाथा मांडणारे रेणू गावस्कर यांचे ‘आम्ही असू लाडके’ आदी सदरे वाचकांच्या मनाशी मुक्तसंवाद साधतील.
चित्रपट दिग्दर्शक परेश मोकाशी, कवी अशोक नायगावकर, आशुतोष जावडेकर, दिनेश गुणे आणि अभिजीत ताम्हणे यांच्या सदरांनी ‘लोकरंग’ रविवारची सकाळ विचारसुंदर बनवणार आहे. याशिवाय लोकरंगमध्ये आहेत दोन विशेष सदरे. समर्थ साधक यांचे रामदास विनवी आणि तुलसी आंबिले यांचे
तुका लोकीं निराळा. मराठी साहित्य, संस्कृती आणि समाजास अखंड जीवनरस पुरविणाऱ्या या दोन
थोर संतांच्या विचारांची समकालिनता अधोरेखित करणारे हे स्तंभ यंदाच्या लोकरंगचे एक वैशिष्टय़च..
तेव्हा वाचनमौजी वर्ष अनुभवण्यासाठी रोजच वाचत राहा ‘लोकसत्ता’.

संपादकीय पान
* शेषराव मोर – संस्कृतीखुणा
* प्रकाश पवार – लोककारण
* अनिकेत भावठाणकर – जगत्कारण

विचार
* श्याम असोलेकर – शहरावरण
* मयुरेश भडसावळे – शहरभान
* परिमल माया सुधाकर – चीनचिंतन
* रुबिना पटेल – संघर्षसंवाद
* उदय अठवणकर आणि सहकारी
– सुसंकल्प

लोकरंग
* सुदाम्याचे ऑरगॅनिक पोहे – परेश मोकाशी
* रामदास विनवी- समर्थ साधक
* तुका लोकी निराळा- तुलसी अंबिले
* मिश्किलीच्या मिषाने – अशोक नायगावकर
* मैफिलीत माझ्या – राहुल रानडे
* ‘वा’ म्हणताना – डॉ. आशुतोष जावडेकर
* मनोविष्कार – केतकी गद्रे
* आजकालच्या कला-कृती – अभिजीत ताम्हणे
* बावनकशी – दिनेश गुणे
* गाजराची तुतारी – निखिल रत्नपारखी

चतुरंग
* दृष्टी आडची सुष्टी – विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या पडद्यामागच्या हृदयस्पर्शी आठवणींचा कोलाज
* उत्तररंग – उत्तरा केळकर
* जगू आनंदे – अंजली श्रोत्रीय
* आपुलाची संवाद आपुल्याशी – माधवी गोखले
* संवादाचा रचला पाया – नीलिमा किराणे
* शिशिरातला वसंत (?) – मृणालिनी चितळे
* आदित्य हे तिमिरातले – संपदा वागळे
* एकला चालो रे – वासंती वर्तक
* आम्ही असू लाडके – रेणू गावस्कर
* शिकू आनंदे – रती भोसले
* कायद्याचा न्याय – अर्चना मोरे