सामाजिक विषयांवर व्यक्त होण्याची विद्यार्थ्यांची धिटाई, सादरीकरणातील नावीन्य यामुळे चुरशीच्या झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धेत औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाची ‘मादी’ ही महाराष्ट्राची लोकांकिका ठरली. लेखन, नैपथ्य, अभिनय या वैयक्तिक पारितोषिकांसह मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालय, आनंदभवनच्या ‘देव हरवला’ या एकांकिकेने द्वितीय पारितोषिक पटकावले. अभिनय, संगीत या वैयक्तिक पारितोषिकांसह पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकांकिकांची परंपरा सक्षमपणे पुढे नेणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पाचव्या पर्वाची महाअंतिम फेरी माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात जल्लोषात पार पडली. नाटय़-चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ, कलावंत, नाटय़रसिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणाईने गर्दी केली होती. नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी अशा आठ विभागांमध्ये अव्वल ठरलेल्या एकांकिकांमध्ये चूरस रंगली. विषयांचे वैविध्य आणि त्याला प्रयोगशीलतेची जोड हे पहिल्या पर्वापासून या स्पर्धेचे वैशिष्ट ठरले. यंदाही सामाजिक विषयांना हात घालत या महाविद्यालयांच्या संघांनी उत्तम मांडणी केल्याचे पाहावयास मिळाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika 2018
First published on: 16-12-2018 at 00:07 IST