मुंबई : चाकोरीबाहेर काम करून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा शोध घेऊन त्यांना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५’ने गौरवले जाणार आहे. स्वत:बरोबर इतरांचाही उत्कर्ष साधायचा, या विचाराने व्यापक समाजकार्य करून समाजहितासाठी झटणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान ‘लोकसत्ता’कडून दरवर्षी करण्यात येतो. यंदा या पुरस्काराचे १२वे वर्ष असून या पुरस्कारांसाठी नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख रविवार ७ सप्टेंबर असून यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असतो. समाजातील कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला सन्मानित करणाऱ्या, समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या स्त्रियांची राज्यभरातून नामांकने मागवली जातात. या पुरस्कारासाठी तुमची माहिती किंवा तुमच्या परिचयातील कर्तबगार आणि ध्येयनिष्ठ स्त्रियांची माहिती रविवार, ७ सप्टेंबरपर्यंत पाठवावी. तज्ज्ञ परीक्षकांची समिती आलेल्या नामांकनांतून दुर्गांची निवड करते. ‘दुर्गां’च्या निवडीनंतर दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत दररोज एका दुर्गेची ‘लोकसत्ता’मधून ओळख करून दिली जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या बहारदार संगीतमय सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते दुर्गांचा सन्मान केला जाणार आहे.
नामांकने पाठवण्यासाठीचे काही नियम –
काय अपेक्षित?
– दुर्गा पुरस्कारासाठी स्त्रियांची माहिती जास्तीत जास्त ५०० शब्दांत पाठवावी. संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे असावे.
– माहिती नेमक्या शब्दांत आणि मुद्द्यांच्या स्वरूपात आणि थोडक्यात असल्यास उत्तम. त्यामुळे निवड प्रक्रिया सहज होते. निवड झालेल्या स्त्रियांकडून नंतर अधिक माहिती मागवली जाईल.
– नामांकन पाठवताना एकाच ई-मेलमध्ये त्या स्त्रीचे छायाचित्र, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक.
– एका व्यक्तीसाठी फक्त एकच ईमेल पाठवावा. जास्त ईमेल्सचा विचार केला जाणार नाही.
– इंग्रजीमधून पाठवलेले नामांकन बाद ठरवले जाईल.
– व्हिडीओ, यूट्यूब लिंक्स किंवा इतर कोणत्याही लिंक्स पाठवू नयेत.
– अंतिम निवडीसाठी परीक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील.
– नमांकने पाठवण्याची अंतिम तारीख रविवार, ७ सप्टेंबर आहे.
माहिती कुठे पाठवाल?
नामांकने फक्त loksattanavdurga@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावीत. त्याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
टपालाने पाठवायची असल्यास पत्ता पुढीलप्रमाणे –
‘लोकसत्ता’ – महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०.