Maharashtra Crisis, Uddhav Thackeray Tests Corona Positive: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही करोनाची लागण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना करोनाची लागण; खासगी रुग्णालयात दाखल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ आणि नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमचा एकही आमदार फुटला नसल्याचं यावेळी कमलनाथ यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह असून फोनवरुन त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली.

Eknath Shinde Live Updates : पक्षात राहून, पदाचा वापर करुन एका दिवसात प्लॅन केला गेला- अरविंद सावंत

“काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला ४४ पैकी ४१ आमदार उपस्थित होते. तीन आमदार प्रवासात आहेत. काँग्रेस पक्षात एकता आहे,” असं कमलनाथ यांनी सांगितलं.

“उद्धव ठाकरेंना करोनाची लागण झाली असून माझी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. काँग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी राहील असं आश्वासन दिलं आहे. भाजपाने झारखंड, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेशात ज्या प्रकारे पैसा आणि पदाचं राजकारण केलं तसंच राजकारण सुरु आहे. हा आपल्या संविधानाशी खेळ आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत एकता कायम राहील याचा आम्हाला विश्वास आहे,” असं कमलनाथ यांनी सांगितलं.

Maharashtra Political Crisis: “मोदी तुकारामाच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले”; एकनाथ शिंदेंच्या बंडावर भुजबळांची प्रतिक्रिया

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी आता शरद पवारांसोबतच्या बैठकीसाठी जात आहे. उद्धव ठाकरेंसोबतही बैठक होती, पण त्यांना करोना झाला आहे. त्यामुळे ही बैठक होणार नाही”. मंत्रिमंडळ सर्वांच्या हिताचा निर्णय घेईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

“मंत्रिमंडळ बैठकीत सरकार बरखास्तीबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण ताकदीने चालेल. त्यादृष्टीने भूमिका घेतली जाईल,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray tests covid positive sgy
First published on: 22-06-2022 at 12:49 IST