मुंबई : काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीरपणे व्यक्त करीत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, हे त्यांनी अगोदर लक्षात घ्यायला हवे. अनेक जण अडचणींमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही. यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा, असे प्रत्युत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर दिले आहे.

संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला, यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी काँग्रेसला लोक सोडून चालले आहेत. संग्राम थोपटे यांनी सर्व काही काँग्रेसला दिले, तरीसुद्धा त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना त्यांच्या पक्षाकडून, राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. कुठलेही धोरण काँग्रेसला नाही. जो-जो काँग्रेस किंवा अन्य पक्षातून येईल त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे. काँग्रेसला फोडा, रिकामी करा’. बावनकुळे यांच्या या वक्तव्याला सपकाळ यांनी उत्तर दिले.