चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन २००९ मध्ये झाले पण पर्यावरणाच्या प्रश्नामुळे या प्रकल्पाच्या कारडेपोला मंजुरी मिळू शकली नाही. परिणाम गेले पाच वर्षे हा प्रकल्प रखडला होता. शिवाय ३२ किलोमीटर लांबीच्या मार्गावर उन्नत मेट्रो रेल्वे बांधणे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात अशक्यप्राय होते. आठवडाभरापूर्वी या मेट्रोचा करार रद्द झाला. त्यानंतर लगेचच धोरणात्मक निर्णय घेत देवेंद्र फडणवीस सरकारने आता ही मेट्रो रेल्वे भुयारी करण्याचा तसेच त्याची लांबी दहिसपर्यंत वाढवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.
आता या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी ४० किलोमीटर झाली असून प्रकल्प खर्च २५ हजार ६५ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. आता या प्रकल्पासाठी गोरेगावात पहाडी येथे २५ हेक्टर जागेवर तर मंडाले येथे १० हेक्टर जागेवर कारडेपो उभारला जाणार आहे.
प्रकल्प खर्चापैकी ५० टक्के रक्कम ‘जायका’ किंवा जागतिक बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज रूपाने घेतली जाईल. तर २० टक्के निधी केंद्र सरकारकडून आणि ३० टक्के रक्कम राज्य सरकार-‘एमएमआरडीए’कडून मिळेल.
वडाळा-घाटकोपर-ठाणे कासारवडवली या मेट्रो रेल्वेची घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्या घोषणेला आता मूर्त रूप आले आहे. हा मेट्रो रेल्वे मार्ग ३२ किलोमीटर लांबीचा असेल. त्यापैकी २७ किलोमीटरचा मार्ग भुयारी तर पाच किलोमीटरचा मार्ग उन्नत असेल.
या मार्गावर २४ भयुारी आणि सहा उन्नत अशी एकूण ३० स्थानके असतील. या प्रकल्पासाठी १९ हजार ९७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी ओवळा येथे २५ हेक्टर जागेवर तर घाटकोपर येथे १६ हेक्टर जागेवर कारडेपो उभारले जातील.
दहिसर- मानखुर्द मार्गावरील ३६ स्थानके  
१. दहिसर २. कांदरपाडा ३. एसव्हीपी कॉलेज ४. एक्सार मेट्रो ५. बोरिवली मेट्रो ६. शिंपोली ७. महावीर नगर ८. कांदिवली मेट्रो ९. चारकोप १०. काचपाडा ११. मालाडा मेट्रो १२. कस्तुरी पार्क १३. बांगुर नगर १४. गोरेगाव बस डेपो १५. म्हाडा कॉलनी १६. शास्त्रीनगर १७. डीएन नगर १८. ईएसआयसी नगर १९.जेव्हीपीडी २०. जुहू २१. जुहू एअरपोर्ट २२. आर्य समाज चौक २३. खार मेट्रो २४. नॅशनल कॉलेज २५. वांद्रे मेट्रो २६. कलानगर, बीकेसी २७. आयटीओ, बीकेसी २८. नाबार्ड, बीकेसी २९. एमटीएनएल, बीकेसी ३०. कुर्ला मेट्रो ३१. कुर्ला पूर्व द्रुतगती महामार्ग ३२. चेंबूर नाका ३३. डायमंड गार्डन ३४. शिवाजी चौक ३५. बीएसएनल फॅक्टरी ३६. मानखुर्द मेट्रो

वडाळा-कासारवडवली मेट्रोची ३० स्थानके
 १. भक्ती पार्क मेट्रो २. आणिक नगर ३. प्रियदर्शनी ४. कुर्ला नेहरू नगर ५. लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रो ६. विद्याविहार ७. घाटकोपर मेट्रो- २ ८. आर-सिटी मेट्रो ९. गोदरेज कॉलनी १०. विक्रोळी मेट्रो ११. गांधी नगर १२. कांजूर मार्ग मेट्रो १३. जनता मार्केट १४. भांडुप मेट्रो १५. शांग्रिला १६. सोनापूर १७. जॉन्सन अँड जॉन्सन १८. मुलुंड नाका १९. ठाणे-तीन हात नाका २०. आरटीओ ठाणे २१. महापालिका मार्ग २२. कॅडबरी जंक्शन २३. माजिवडा २४. कापूरबावडी २५. मानपाडा २६. टिकुजिनी वाडी २७. पाटलीपाडा २८. वाघबीळ २९. आनंद नगर ३०. कासारवडवली (यापैकी मानपाडा ते कासारवडवली ही स्थानके उन्नत)