मुंबई: राज्यातील माल वाहतूकदार, बस मालक संघटना, स्कूल बस असोसिएशन व इतर वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनास उपाययोजना सांगणाऱ्या समितीची स्थापना राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही दहा जणांची समिती राज्यातील वाहतूकदारांचे प्रश्न आणि समस्या शासनाला कळविणार आहे या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना अहवाल देणार आहे.
परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीत सह आयुक्त, अपर पोलीस महासंचालक(वाहतूक) अपर परिवहन आयुक्त, बस ऑपरेटर संघटनेचे प्रसन्न पटवर्धन, ऑल इंडिया मोटर असोसिएशनचे बलमलकित सिंग, मुंबई बस संघटनेचे दीपक नाईक, वाहतूकदार बचाव कृती संघटनेचे उदयसिंग बर्गे, अवजड वाहतूकदार संघटनेचे प्रवीण पैठणकर, पोलीस सह आयुक्त अशा दहा जणांचा समावेश आहे. पुढील एक महिन्यात ही समिती राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे