मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची मंजूर पदांची संख्या ७५ इतकी असून, या निर्णयामुळे ती ९४ इतकी होणार आहे. न्यायमूर्तींच्या वाढीव संख्येमुळे अनुषंगिक व संबंधित कर्मचाऱ्यांची १६२ पदेही वाढणार आहेत. त्यासाठी एकूण १६.८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. न्यायमूर्तींची पदे वाढल्याने उच्च्ा न्यायालयात प्रलंबित असलेले दावे आणि याचिका निकाली निघण्यास मदत होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2015 रोजी प्रकाशित
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली.

First published on: 13-03-2015 at 05:29 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra govt decision to increase judges in high court