करोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन व अन्य दिवस कडक निर्बंध लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  राज्य सरकारच्या या निर्णयानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात लॉकडाउनसंबधी ट्विटरवर मीम्स

 

 

 

 

 

 

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन करण्यात येणार आहे. रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा 144 कलम लागू (जमावबंदी) असेल, असे मलिक यांनी सांगितले.

काय सुरू काय बंद?

राज्यात आठवड्याला लॉकडाउनमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसतील, अशी माहिती मलिक यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra lockdown memes goes viral on twitter adn
First published on: 04-04-2021 at 19:22 IST