स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गृह विभागाने पोलीस शौर्य, गुणवत्तापूर्वक सेवा आणि राष्ट्रपती पदके  जाहीर केली. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ५८ पदके  पटकावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार (वायरलेस विभागाचे संचालक) आणि संजीव सिंघल (आस्थापना) यांना प्रतिष्ठापूर्व सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर पोलीस उपमहानिरीक्षक विनायक देशमुख यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले.

कुमार आणि सिंघल यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सुषमा चव्हाण, लातूरचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश मेहत्रे यांना राष्ट्रपती पदक तर उपनिरीक्षक राजेश खांडवे, शिपाई मनीष गोर्ले, गोवर्धन वढाई, कैलास उसेंडी, कुमारशा किरंगे, शिवाले हिडको, सुरेश कोवासे, रतीराम पोरेटी, प्रदीपकु मार गेडाम, राकेश नरोटे, राकेश हिचामी, वसंत तडवी, सुभाष उसेंडी आणि रमेश कोमिरे यांना शौर्य पदक जाहीर झाले.

गुणवत्तापूर्वक सेवेसाठी उपमहानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देशमुख यांच्यासह पुण्याचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, मरोळ प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक तुषार दोषी, अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक शालिनी शर्मा, मुंबई गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक केदारी पवार, विनय घोरपडे, चेंबूर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक विश्वास भोसले आदींसह ३९ जणांना पदक जाहीर झाले.

मोहनचंद शर्मा, नरेश कुमार यांना सातव्यांदा शौर्यपदक

बाटला हाऊस चकमकीत २००८ मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदके जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे. शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण ८१ तर  केंद्रीय राखीव पोलीस दलास ५५ पदके जाहीर झाली आहेत. ९२६ पदके जाहीर करण्यात आली.  त्यात शौर्य पदके, विशेष सेवा व इतर पदकांचा यात समावेश आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना २३ शौर्य पदके मिळाली असून दिल्ली पोलिसांना १६, झारखंड १२  या प्रमाणे पदके मिळाली आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक व आयपीएस अधिकारी अतुल कारवाल यांना दुसऱ्यांदा गौरवण्यात आले आहे. ५५ शौर्यपदकांपैकी  ४१ जम्मू-काश्मीरला, १४ नक्षलविरोधी कारवायांसाठी छत्तीसगडला मिळाली आहेत. सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट  विनय प्रसाद यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले आहे. विंग कमांडर विशाक नायर यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra police won 58 medals abn
First published on: 15-08-2020 at 00:27 IST