‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल् मुसलिमीन’ अर्थात ‘एमआयएम’च्या दोन्ही आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विधानसभेत विरोधी बाकांवर बसणार असल्याचेही एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी बुधवारी जाहीर केले.
‘एमआयएम’चे आमदार भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार नाहीत. विरोधी बाकांवर बसून आम्ही प्रभावीपणे विरोधकाची भूमिका निभावू, असेही इम्तियाज म्हणाले.
भायखळा मतदार संघातून निवडून आलेले वारिश युसूफ पठाण आणि औरंगाबाद मध्यमधून इम्तियाझ जलिल हे दोन आमदार विधानसभेत ‘एमआयएम’चे प्रतिनिधित्व करत आहेत.
शिवसेनेने पाठोपाठ आता ‘एमआयएम’नेही भाजपविरोधात मतदान करण्याचे ठरविल्याने बहुमताचा आकडा गाठण्याचा भाजपचा मार्ग धुसर होताना दिसत आहे. अशावेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2014 रोजी प्रकाशित
‘एमआयएम’ भाजपच्या विरोधात मतदान करणार
'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल् मुसलिमीन' अर्थात 'एमआयएम'च्या दोन्ही आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 12-11-2014 at 12:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra trust vote mim to vote against bjp