मुंबई-गोवा महामार्गावर रसायनाने भरलेला टँकर झाडावर आदळून टँकरने पेट घेतला. महामार्गावर माणगाव शहराच्या जुने माणगाव भागात ही घटना मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
महाडकडून रसायन घेऊन येणारा टँकर माणगाव शहराच्या जुने माणगाव येथे आला असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि तो रस्त्यालगत असलेल्या झाडावर जावून आदळला. त्यामुळे टँकरने पेट घेतला. आग लागल्यानंतर टँकरमधून स्फोटाचे मोठमोठे आवाज यायला लागले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. महामार्गावर दोन्ही बाजूला अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांनी पाण्याचे टँकर आणून आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागलेला टँकर बाजूला करण्यात आला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2016 रोजी प्रकाशित
मुंबई- गोवा महामार्गावर अपघातानंतर टँकरने घेतला पेट
सध्या ट्रकमधील सिलेंडर्स एकामागोमाग फुटत असल्याचे वृत्त आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 14-06-2016 at 17:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major accident on mumbai goa highway