कांदिवलीच्या दामूनगर झोपडपट्टीत आग लागल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री कुर्ला येथे भीषण आग लागल्याची घटना घडली. कुर्ल्यातील रोकैय्या इस्टेटमध्ये ही आग लागली. या परिसरात दाटीवाटीने गोदामं असल्याने आग वेगाने पसरली आणि आगीत पाच गोदामं जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर दोन तासांनी अग्नीशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवनहानी झालेली नाही. मात्र, लाखोंचे नुकसान झाले आहे.