मुंबई : बीडमधील महिला पोलीस ललिता साळवे हिने लिंग परिवर्तन केल्यानंतर लिंग परिवर्तन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात पुरुषांमध्ये लिंग परिवर्तन करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार मुंबईत शीव रुग्णालयात मागील काही महिन्यांत २१ पुरुषांनी लिंग परिवर्तन करून घेतले, तर सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिंग परिवर्तनासाठी नोंदणी केलेल्यांमध्ये चारपैकी तिघे पुरुष आहेत.

महिला पोलीस ललिता साळवेला पुरुष बनविण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिंग परिवर्तन करण्यासाठी चार जणांनी नोंदणी केली आहे. त्यात तीन पुरुषांचा तर एका महिलेचा समावेश आहे. नोंदणी करणाऱ्या पुरुषांचे वय हे २६ ते ३० वर्षांदरम्यान असून, महिलेचे वय जवळपास ३० वर्षांच्या आसपास आहे. नाेंदणी केलेल्या या तरुणांच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. चौथ्या व्यक्तीने नोंदणी केल्यानंतर रुग्णालयाशी संपर्क साधला नसल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सागर गुंडेवार यांनी दिली. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या शीव रुग्णालयातही मागील काही महिन्यांमध्ये लिंग परिवर्तन करणाऱ्या २८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यात २१ पुरुष लिंग परिवर्तन करून महिला झाले आहेत. आतापर्यंत फक्त सात महिला लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून पुरुष झाल्या आहेत.

Self consciousness after acceptance of Buddhism by Dalits
‘धम्म’ स्वीकारानंतरचे आत्मभान
चौथ्या तिमाहीत विकासदर ६.२ टक्क्यांपर्यंत मंदावण्याचा अंदाज; तिमाही तसेच आर्थिक वर्षासाठी आकडेवारी ३१ मेला अपेक्षित
rishi sunak
ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचं प्रमाण घटवणार, नव्या नियमांमुळे ८० टक्के अर्जांमध्ये घट; ऋषी सुनक यांची माहिती
Hajj pilgrims, app, devotees,
हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा
transgenders are extorting forcefully from citizen in nagpur
नागपुरात तृतीयपंथीयांकडून सर्वसामान्यांची लूट! मुलगा जन्मल्यास सोन्याची साखळी…
Navpancham Yog 2024
Navpancham Yog 2024 : १०० वर्षानंतर गुरू अन् केतू निर्माण करणार नवपंचम योग, ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
loksatta analysis conflict between the majority maitei and minority kuki tribes in manipur
विश्लेषण : मणिपूर हिंसाचाराची वर्षपूर्ती… शाश्वत शांतता नांदणार कधी? 
Asthma deaths in india
विश्लेषण : जगातील ४६ टक्के दमा मृत्यू भारतात… दम्याच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय आवश्यक?

हेही वाचा – मुंबईतून अटक झालेले इस्लामी धर्मगुरु सलमान अजहरी कोण आहेत?

हेही वाचा – मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेविरोधात जमाव गोळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलिसांवर दगडफेक


  • लिंग परिर्वतन करण्यात येणाऱ्या व्यक्तीचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येते.
  • त्यानंतर संबंधित व्यक्तीला महिला किंवा पुरुष बनायचे असल्यास त्याला काही दिवस त्यांचे कपडे घालण्यास सांगितले जाते.
  • ठरावीक दिवसांनंतर त्या व्यक्तीला संप्रेरक उपचार पद्धतीसाठी एंडोक्रिनोलॉजिस्टकडे पाठविण्यात येते.
  • पुरुषांच्या छातीची शस्त्रक्रिया करून स्तन प्रत्यारोपण तर महिलांमधील स्तन काढण्याची प्रक्रिया केली जाते.
  • अंतिम शस्त्रक्रिया लिंग परिवर्तनाची असते. ही शस्त्रक्रिया सुघटनशल्य चिकित्सक आणि मूत्रपिंडविकार तज्ज्ञ एकत्रित किंवा स्वतंत्ररित्या करतात.