मुंबईतील मुस्लीम धर्मगुरु आणि इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरींना द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गुजरात एटीएसने घाटकोपर येथून काल रात्री (दि. ४ फेब्रुवारी) अटक केली. ३१ जानेवारी रोजी गुजरातच्या जुनागड येथे द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी जुनागड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएस अजहरींना अटक करण्यासाठी घाटकोपर येथे आले असताना अजहरींच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाला शांत राहण्याचे आवाहन पोलीस आणि अजहरी यांनी केले. समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केल्यामुळे रात्री काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

मुफ्ती सलमान अजहरी कोण आहेत?

मुफ्ती सलमान अजहरी हे सुन्नी इस्लामिक अभ्यासक आहेत. मुंबईमध्ये त्यांनी जामिया रियाजुल जन्नाह, अल अमन शिक्षण आणि कल्याण संस्था आणि दारुल अमन या संस्थांची त्यांनी स्थापना केलेली आहे. इजिप्तमधील अल-अजहर विश्वविद्यालयमधून त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. सलमान अजहरी यांचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत.

readers comments on loksatta editorial
लोकमानस : निरुपयोगी शिक्षणात वेळ घालवण्याची परंपरा
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

गुजरात ATS कडून मुंबईत मुस्लिम धर्मगुरु सलमान अजहरींना अटक, घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जमावाची घोषणाबाजी

इस्लाम अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. त्यांच्यावर अनेकदा द्वेषयुक्त भाषण आणि असहिष्णुतेला प्रोत्साहन देण्याबाबात आरोप झालेले आहेत. २०१८ साली कर्नाटक येथे हिंदूंबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र त्यांच्यावरील गुन्हा अद्यापही शाबूत आहे.

शनिवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी मुफ्ती सलमान अजहरी यांजे वादग्रस्त भाषण व्हायरल झाल्यानंतर जुनागढ पोलिसांनी दोन लोकांना अटक केली होती, अशी माहिती जुनागडमधील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. जुनागडमधील बी विभाग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका खुल्या मैदानावर ३१ जानेवारी रोजी अजहरी यांचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात अजहरी यांनी सदर द्वेषपूर्ण भाषण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या भाषणाचा व्हि़डिओ व्हायरल झाल्यानंतर अजहरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद युसूफ मलेक आणि अझीम हबीब यांना भारतीय दंड विधान कलम १५३ ब (धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) आणि कलम ५०५ (२) (सार्वजनिक अशांतता निर्माण होण्यास कारणीभूत ठरेल असे विधान करणे) अंतर्गत अटक करण्यात आले.

अफवा पसरवू नका पोलिसांचे आवाहन

अजहरींना अटक करताना तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत म्हणाले, “मुंबई आणि घाटकोपर परिसरात शांतता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबई पोलिसांना सहकार्य करा. सामान्य माणसांसाठी मुंबई पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे लोकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता आम्हाला सहकार्य करावे.”

अजहरींचे वकील काय म्हणाले?

अजहरींचे वकील आरिफ सिद्दकी यांनी अटकेनंतर एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हटले की, अजहरींना अटक करण्यापूर्वी नोटीस देणे गरजेचे आहे. ती नोटीस आम्हाला देण्यात आलेली नाही. सात वर्षांची शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात आरोपीला नोटीस देणे गरजेचे आहे, नोटीसीचे पालन केले नाही तर अटक करण्यात येते. अजहरी यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आम्हाला कळलेल्या माहितीनुसार त्यांना जुनागड येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.