हातात बनावट बंदूक घेऊन रेल्वे रुळावर बसून स्टंट करण्याऱ्या २१ वर्षीय तरूणाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने आत्महत्येचा स्टंट करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. जो व्हायरल झाला आहे. अरमान कयूम शेख, असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. यापूर्वी अशाच प्रकारच्या स्टंटबाजीप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तो सोशल मीडीयावर खासकरुन इन्स्टाग्रामवर स्टंटचे व्हिडिओ पोस्ट करत राहतो.

काही दिवसांपूर्वी हा युवक अंधेरी रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर बसला होता. त्याठीकाणी तो व्हिडिओ धोकादायकरीत्या व्हिडिओ बनवित होता. त्याच्या हातात एक बनावट बंदूक होती. आरोपीने स्वतःवर गोळीबार केल्याचे नाटक केले आणि तो रुळावर पडला. आरोपीने मंगळवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रेल्वे पोलिस आयुक्त, जीआरपी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग केले आणि या प्रकरणाची तक्रार दिली.

हेही वाचा – “मालाड इमारत दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा” उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश!

यानंतर अंधेरी रेल्वे पोलिसांनी आयपीसीच्या कलम १८८ अन्वये करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि परवानगी न घेता रेल्वे आवारात प्रवेश केल्याबद्दल रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदविला.

पोलिसांनी लवकरच युवकाला अटक केली होती. दरम्यान, त्याला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे.  वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले की, आरोपींनी व्हिडिओमध्ये वापरलेली पिस्तूल ही सिगारेट लाइटर होती.