ठाण्यात ओव्हरहेड वायरच्या खांबावर एक माथेफिरु चढला होता. त्याला आता खाली उतरवण्यात आलं आहे. मात्र त्यामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर चांगलाच खोळंबा झाला आहे. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल्स १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. इतकंच नाही तर मुलुंड ते नाहूरच्या दरम्यान सात लोकल पाठोपाठ उभ्या आहेत.
ठाणे स्टेशनवळच्या ओव्हरहेड वायरच्या खांबावर एक माणूस चढला. तो खाली उतरायलाच तयार नव्हता. त्यामुळे ठाणे स्टेशनच्या आधी सात लोकल थांबवण्यात आल्या. धीम्या मार्गावर ही समस्या उद्धभवली. अनेकांनी खाली उतरुन ट्रॅकवरुन चालत जाणे पसंत केले. अखेर बऱ्याच प्रयत्नांनी या माणसाला खाली उतरवण्यात आले. अग्निशमन दलाने सुमारे ४५ मिनिटांनी या माणसाला खाली उतरवण्यात आले आहे. मात्र मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. धीम्या गतीने जाणाऱ्या मार्गावर लोकल उशिराने धावत आहेत.