भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जाहीर झालेला पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळय़ात या पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व मंगेशकर कुटुंबियांबरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. आमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच रंगली. मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र याच नाव नसण्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> मोठ्या राजकीय घडामोडींची चाहूल? “राष्ट्रपती राजवट लावा… लै…”; रात्री एक वाजून एक मिनिटांनी आव्हांडांची पोस्ट

आव्हाड यांनी ट्विटरवरुन केलेल्या एका पोस्टमध्ये ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. ही पत्रिका शेअर करत त्यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर टीका केलीय. “लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे,” असं आव्हाड म्हणालेत.

नक्की वाचा >. मंगेशकर कुटुंबाने महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा अपमान केला म्हणणाऱ्या आव्हाडांना भाजपाचं उत्तर; म्हणाले, “काही महाभाग…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवडीमधील शिंदे आजींच्या भेटीला गेले होते. मातोश्रीबाहेर राणा दांपत्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये शिंदे आजीही सहभागी झाल्या होत्या. त्याचा झुकेगा नही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री पत्नी रश्मी ठाकरे आणि दोन्ही मुलांसोबत शिंदे यांच्या घरी पोहोचले होते.