केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव तात्पुरता गोठण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर काल शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘धगधगत्या मशाली’ला शिंदे गट ‘ढाल-तलवारी’ने देणार उत्तर; निवडणूक आयोगाने दिला निर्णय

काय म्हणाल्या मनिषा कायंदे?

“शिंदे गटाला काय चिन्ह मिळाले यावर बोलण्याची आवश्यकता नाही. आमची मशाल ही धगधगती आग आहे आणि ४० मुंडक्यांच्या रावणाला ही आग पेटवल्याशिवाय राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा – ऋतुजा लटकेंना पक्षात आणून उमेदवारीसाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निवडणूक आयोगाने जे नाव आम्हाला दिले, तो अंतरिम निर्णय आहे. आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली आहे. दिवंगत रमेश लटके हे शिवसैनिक होते आणि जे सोडून गेले ते म्हणतात, आम्ही शिवसैनिक आहोत. मग एका जागेसाठी एवढा अट्टहास का?” असा प्रश्नही त्यांनी शिंदे गटाला विचारला आहे. “आम्हाला जी मशाल मिळाली आहे, ती घरोघरी पोहोचवण्याचे काम आम्ही करू. या पोटनिवडणुकीत आमचाच विजय होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “जे धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांनी ठरवले, ते गोठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, हे कोणालाही पटणारे नाही”, असेही त्या म्हणाल्या.