ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असे कुटुंब आहे. दुपारी शिवाजी पार्कमध्ये सुधीर भट यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार असून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे.
नाट्य क्षेत्रात प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या सुधीर भट यांनी ‘मोरूची मावशी’, ‘कलम ३०२’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘जादू तेरी नजर’, ‘गांधी विरुद्ध गांधी’, ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘किरवंत’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क, ‘जावई माझा भला’ अशा एकूण ७५ नाटकांची निर्मिती केली होती. देशा-विदेशात मराठी नाटकांचे प्रयोग करण्यासाठी यांनी बरीच धडपड केली. त्यांच्या अनेक गाजलेल्या नाटकांना युरोप, अमेरिकेतही उत्तम प्रतिसाद मिळाला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2013 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे निधन
ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
First published on: 16-11-2013 at 09:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi theater producer sudhir bhat pass away