विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ व आसाम या चार राज्यांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

पाच राज्यांच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित आहेत. या राज्यांमध्ये भाजपला चांगले यश मिळावे या उद्देशानेच अर्थसंकल्पात झुकते माप देण्यात आले. चारपैकी तमिळनाडू आणि के रळ या दोन राज्यांमध्ये भाजपला फार काही चांगल्या यशाची अपेक्षा नाही. तमिळनाडूत अण्णा द्रमुकबरोबर युतीत सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आसाममध्ये सत्ता कायम राखण्याकरिता भाजपने जोर लावला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हटवून सत्ता मिळविण्याचा भाजपने चंग बांधला आहे. यातूनच पश्चिम बंगालवर विशेष भर देण्यात आलेला दिसतो.

कोणत्या राज्याला काय मिळाले

तमिळनाडू :

* १ लाख ०३ हजार कोटी खर्चून राष्ट्रीय महामार्गाची कामे. मदुराई-कोलम आणि चित्तोर-थातचूर कॉरिडॉरची कामे

* चेन्नई मेट्रो ल्लचेन्नईत मत्स्य बंदर

* वनस्पती पार्क

* अर्थमंत्र्यांच्या भाषणात तमिळ काव्यपंगतीचा उल्लेख

केरळ :

* ६५ हजार कोटी खर्चून राष्ट्रीय महामार्गाची कामे. यात मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरचे केरळमधील ६०० कि.मी. अंतराचे काम

* कोची मेट्रो टप्पा -२.१९५७ कोटींची तरतूद

* कोचीमध्ये मत्स्य बंदर

आसाम :

* राष्ट्रीय महामार्गाची १९ हजार कोटींची कामे सध्या सुरू * पुढील तीन वर्षांत राष्ट्रीय महामार्गाची ३४ हजार कोटींची कामे

* चहा मळ्यातील कामगारांच्या कल्याणासाठी निधी

पश्चिम बंगाल :

* पश्चिम बंगालमधील ६७५ किमी. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी २५ हजार कोटींची तरतूद. कोलकत्ता-सिलीगुडी रस्त्याची सुधारणा

* रेल्वे मालवाहतुकीसाठी झारखंडमधील गोमोह ते पश्चिम बंगालमधील दानकुनीपर्यंत मार्ग

* खरगपूर-विजयवाडा रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर ल्लखरगपूर-दानकुनी-भुसावळ रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर

* पेटुआघाट येथे मस्त्य बंदर

* चहा मळ्यातील कामगारांच्या कल्याणसाठी निधी (पश्चिम बंगाल व आसामसाठी हजार कोटींची तरतूद).