विविध प्रकारच्या अभियांत्रिकी कामासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार घेतला जाणारा मेगाब्लॉक रक्षाबंधनामुळे रेल्वेने रद्द केला. मध्य व हार्बरवर रविवारी मेगाब्लॉक होता. मात्र रक्षाबंधनासाठी लोक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडत असल्याने गरसोय टाळण्यासाठी मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. काही खासदारांनाही रेल्वेला तशी विनंती केली होती.