मुंबई :  उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी (१६ फेब्रुवारी) मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून सकाळी साडेअकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे, तर काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वे

* कुठे : मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेने अप धिम्या मार्गावर

* कधी :  स. ११.३० ते दु. ४ वाजेपर्यंत

* परिणामी : मुलुंड ते माटुंगा ब्लॉकदरम्यान सर्व धिम्या लोकल अप जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेस, लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

* कुठे :  पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर

* कधी : स. ११.३० ते दु. ४ पर्यंत ब्लॉक.

* परिणामी : पनवेल ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल या दोन्ही मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. तसेच पनवेल ते अंधेरी आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते पनवेल या मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येतील. या दरम्यान सीएसएमटी ते वाशी आणि ट्रान्स हार्बरवरून ठाणे ते नेरुळ या मार्गावरून विशेष गाडय़ा सोडण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

* कुठे : सांताक्रूझ ते माहीम या अप व डाऊन जलद मार्गावर

* कधी : स. १०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत

* परिणाम :  ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गवरील लोकल अप-डाऊन धिम्या मार्गवर वळविण्यात येणार आहेत. या दरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block on western central line and harbour line on sunday zws
First published on: 15-02-2020 at 01:53 IST