मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार असून पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत ठाणे ते कल्याणदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा – भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन डाऊन मार्गावर

कुठे : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे, सीएसएमटी-वाशी/बेलापूर/पनवेल, सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन रेल्वे मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला फलाट क्रमांक ८ वरून दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे.

हेही वाचा – ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून दोन महिलांची पाच लाखांची फसवणूक

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी मध्यरात्री १२ ते रात्री ३.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल विरार ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Megablocks on central western railways mumbai print news ssb