भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) बाल शिवाजी आणि जिजामाता यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी बसवण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू देखभाल विभागाने तांब्याच्या धातूपासून मेघडंबरी तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ४३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा- Mumbai Sakinaka Fire: साकीनाक्यात प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

मुंबईमधील राणीची बाग पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. सध्या राणीच्या बागेचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत बालशिवाजी आणि जिजामाता यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी बसविण्यात येणार आहे. ब्रॉन्झपासून तयार केलेल्या या पुतळ्याचे १९९२ मध्ये राणीच्या बागेत अनावरण करण्यात आले होते. बाल शिवाजी आणि जिजाऊंचा हा पुतळा राणीच्या बागेतील एक खास आकर्षण आहे.

हेही वाचा- राहुल यांच्या पदयात्रेच्या वेळी शक्तिप्रदर्शनाची तयारी; भारत जोडो यात्रेत नांदेड, शेगावला सभा 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेघडंबरी तयार करताना पुतळा कोणत्याही बाजूने झाकला जाणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. मेघडंबरीमुळे पुतळ्याचे ऊन पावसापासून संरक्षण होईल आणि त्याच्या सौंदर्यातही भर पडेल, असे पुरातन वास्तू देखभाल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.