मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील अंधेरी पश्चिम (डीएन नगर) मेट्रो स्थानकात गुरुवारी एक माकड मुक्तसंचार करीत होते. मेट्रो स्थानकात फिरणाऱ्या या माकडाचे छायाचित्र आणि चित्रफीत सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ अ मार्गिकेवरील अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकात दुपारी १ च्या सुमारास एक माकड फिरत असल्याचे प्रवाशांच्या दृष्टीस पडले. काही प्रवासी या माकडाकडे दुर्लक्ष करीत प्रवास करीत होते. तर काही प्रवासी या माकडाची चित्रफीत आणि छायाचित्रे टिपण्यात व्यग्र होते.
‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील अंधेरी पश्चिम (डीएन नगर) मेट्रो स्थानकात गुरुवारी एक माकड मुक्तसंचार करीत होते. मेट्रो स्थानकात फिरणाऱ्या या माकडाचे छायाचित्र आणि चित्रफीत सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
— LoksattaLive (@LoksattaLive) August 28, 2025
व्हिडीओ सौजन्य: व्हायरल व्हिडीओ… pic.twitter.com/kXoEvI9fFH
चित्रफीत, छायाचित्र काढणाऱ्या एक -दोन प्रवाशाच्या अंगावर जाण्याचाही प्रयत्न या माकडाने केला. मात्र प्रवाशांनी तात्काळ तेथून पळ काढल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भरदिवसाचा मेट्रो स्थानकात माकडाचा मुक्तसंचार सुरू असल्याने प्रवाशांना प्रवासादरम्यान काळजी घेण्याची, सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.