मेट्रोच्या कारडेपोसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या कामाला आणि या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. विधान परिषदेमध्ये याबाबत त्यांनी माहिती दिली. मेट्रोच्या कारडेपोसाठी नवीन जागा शोधण्याचे काम सुरू असून, ती मिळाल्यावर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेट्रोच्या कारडेपोसाठी आरे कॉलनीतील जागा बळकाविण्याचा डाव असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यायी जागांचा शोध तज्ज्ञांची समिती घेत आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2015 रोजी प्रकाशित
मेट्रोच्या कारडेपोसाठी ‘आरे’च्या प्रस्तावाला तूर्त स्थगिती
मेट्रोच्या कारडेपोसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या कामाला आणि या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली.

First published on: 25-03-2015 at 04:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro car depo interim stay to aarey colony land