महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई आणि कोकण गृहनिर्माण व क्षेत्रनिर्माण मंडळातर्फे एकूण १०६३ घरांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यापैकी मुंबई विभागातील ९९७ घरांची तसचे अंध व अपंगांसाठीच्या दोन्ही विभागातील ६६ घरांसाठीची सोडत आज (रविवार, ३१मे) रोजी सकाळी १० मे दुपारी २ या वेळेत काढण्यात येणार आहे. ही सोडत संगणकीय पद्धतीने वांद्रे येथील रंगशारदा नाटय़गृहात काढली जाणार आहे.
यंदा मुंबई व कोकण विभागाच्या १०६३ घरांसाठी १ लाख २५ हजार ८४४ अर्ज पात्र ठरले आहेत. अर्जदार नाटय़गृहात उपस्थित राहून सोडतीचा लाभ घेऊ शकतील किंवा नाटय़गृहाबाहेरील मंडपावरील स्क्रीनमध्येही सोडत पाहू शकतील. हा निकाल सायंकाळी ६ नंतर ’३३ी१८.ेिँं.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावरही उपलब्ध होईल.
म्हाडाची सोडत यंदा प्रथमच मुंबईकरांना घरबसल्या अनुभवता येणार आहे. या सोडतीचे थेट वेबकास्ट प्रक्षेपण लोकांना ेिँं.४ूं२३.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
सोडतीचा क्रम (वेळ व योजना संकेत क्रमांक)
*स. १० ते दु. १२.३० – ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६
*दु. १२.३० ते २.३० – २५७ अ, २५८ अ, २६० अ, २६५ब, २६६ब, २६७ब, २६८ ब, २७०ब, २७१ब, २७२अ, २७३अ, २८३अ, २८४ अ, २८५ अ, २८६अ, २८७अ, २८८अ, २५४अ, २५५अ.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2015 रोजी प्रकाशित
म्हाडाची आज सोडत
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई आणि कोकण गृहनिर्माण व क्षेत्रनिर्माण मंडळातर्फे एकूण १०६३ घरांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.
First published on: 31-05-2015 at 05:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada lottery to be held on sunday