जमिनीच्या कमतरतेमुळे झुंजत असलेली म्हाडा आता पुन्हा त्यांच्या संयुक्त उद्यम योजनेस (जॉइंट वेंचर) सुरुवात करणार असून, अधिक विकासकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. परवडणा-या दरात गृहनिर्माण करण्यासाठी खासगी जमिनीकरता हा संयुक्त उपक्रम करण्यात येणार आहे. या सुधारणेमध्ये म्हाडा संपूर्ण जमीन त्यांच्या नावे हस्तांतरित करण्याऐवजी विकासक त्या खासगी जागेस स्वतःचे नाव देऊ शकणार आहेत. विकासकांना केवळ गृहनिर्माण योजनेत म्हाडाच्या नावे समभाग अंतरित करावे लागणार आहेत.
एकदा ही योजना सुरु झाल्यास विकासकांना ती नक्कीच आवडेल आणि ते यात सहभागीही होतील. न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा बदल करत आहोत,” असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने वर्तक नगर, ठाणे या प्रकल्प प्रकरणी संपूर्ण जमीन विकासकांना म्हाडाच्या नावे हस्तांतरित करण्याची गरज नसल्याचे सांगितले. मॅरेथॉन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मयुर शाह यांनी ठाणे, मुलुंड, भांडुप,लोअर परळ या भागातील त्यांच्या कंपनीच्या खासगी जागेवर ही योजना राबविण्यात रुची असल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2013 रोजी प्रकाशित
बिल्डर्सना आकर्षित करण्यासाठी म्हाडाची नवीन योजना
जमिनीच्या कमतरतेमुळे झुंजत असलेली म्हाडा आता पुन्हा त्यांच्या संयुक्त उद्यम योजनेस (जॉइंट वेंचर) सुरुवात करणार असून, अधिक विकासकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. परवडणा-या दरात गृहनिर्माण करण्यासाठी खासगी जमिनीकरता हा संयुक्त उपक्रम करण्यात येणार आहे.
First published on: 18-06-2013 at 12:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada to modify jv scheme to attract builders